नवी मुंबई : केंद्र शासनाच्या प्रयासातून भारतवासियांना वितरीत केल्या जाणार्या एल.ई.डी बल्ब कोपरखैरणे ग्रामस्थांनाही उपलब्ध व्हावे या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नगरसेवक मुनवर पटेल यांच्या प्रयासातून ७ व ८ नोव्हेंबर रोजी एल.ई.डी बल्बचे वितरण केले जाणार आहे.
हसन मियॉं पटेल मंजिल, पीर दाउद शहा मार्ग, खैरणे गावातील मस्जिद समोर सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत या एल.ई.डी बल्बचे वितरण केले जाणार असून या योजनेतर्ंगत ४०० रूपये किंमतीचा बल्ब खैरणे ग्रामस्थांना अवघ्या १०० रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून एल.ई.डी बल्बची खरेदी करावी असे आवाहन नगरसेवक मुनवर पटेल यांनी केले आहे.