नवी मुंबई : महानगरपालिका इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दिवाळी निमित्त विविध खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू, रांगोळी, कंदील, पणत्या, हस्तवस्तू प्रदर्शन व विक्री यांचे इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.
अपंग व्यक्ती व अपंग मुलांच्या पालकांना सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असून अपंग व्यक्ती व अपंग मुलांच्या पालकांना या प्रदर्शनात खाद्यपदार्थ, सजावटी वस्तू, रांगोळी, कंदील, पणत्या, हस्तवस्तू अशा विविध प्रकारच्या दिवाळीच्या वस्तूंचे स्टॉल लावून विक्री करण्याची संधी देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाला भेट देऊन अनेक नागरिकांनी उत्साहाने खरेदी केली.