शिवसेना नगरसेवक नामदेव भगतांचा पुढाकार
नवी मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने नवी मुंबईकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी याकरता शिवसेनेच्या वतीने नेरूळ (प.) रेल्वेस्थानकाजवळील वाहनतळावर ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी या कार्यक्रम आयोजनात पुढाकार घेतला असून माजी नगरसेविका सौ. इंदूमती भगत आणि लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते १० या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी व हिंदी सुमधूर गाण्यांची मैफील सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना खासदार राजन विचारे व शिवसेना उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघठक सौ. रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने, महिला शहर संघठक सौ. रोहीणी भोईर, नगरसेवक काशिनाथ पवार, रंगनाथ औटी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक-नगरसेविका व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये सारेगमफेम गायिका सौ. अनुजा वर्तक, ईटीव्हीफेम गायक निलेश निरगुडकर, सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका सौ. दिपाली केळकर, गायिका सौ. काश्मिरा राईलवार, आनंद कुलकर्णी, विवेक भागवत, जितु गायकर, समीर कर्वे, चंद्रकांत पांचाळ, सुनील गव्हाणकर आदींच्या गायक सहभागी होणार आहेत.
नेरूळमध्ये दिवाळीच्या उत्सवामध्ये नेरूळमध्ये प्रथमच दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यानिमित्ताने दिवाळीची सुरूवातच उत्साही, प्रफूल्लित व मंगलमय करण्याकरता नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक नामदेव भगत यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाकरता लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व नेरूळमधील शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या परिश्रम करत आहेत.