नवी मुंबई : बेलापुरच्या भाजपा आमदार आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंकडून गरजू व गरीब लोकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य गोर गरीब गरजू लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोर गरीबांचा दिवाळी सणासाठी मोठी मदत होणार असल्याचं मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला. गरीबाच्या चेहर्यावरचा हा आनंद पाहून आपली दिवाळी साजरी झाल्याचं मत ताईंनी व्यक्त केलं.
याचप्रमाणे गरजू व गरीब लोकांनी ही मिळालेल्या मोफत धान्यामुळे आमची गरज भागली असून महागाईच्या काळात आम्हाला ताईंनी फार मोलाची मदत केल्याचं मत व्यक्त केलं. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या गेल्या २० वर्षापासून अशा प्रकारची सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्या असून गोर गरीबांमध्ये तीनच्या कार्यामुळे एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमप्रसंगी नवी मुंबई भाजपचे जेष्ठ नेते मारुती भोईर, गोपाल गायकवाड, डॉ.राजेश पाटील, श्रीराम घाटे, रामभाऊ मुळे, एकनाथ मगडवार, विज्ञान म्हात्रे, रवी ठाकूर उपस्थित होते.