सिंधुदुर्ग : दिवाळी सुटीच्या निमित्ताने सध्या कोकण हाऊस फुल्ल झाले आहे. सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांच स्कूबा ड्रायव्हिंग स्नोर्कलिंग आणि पेरेसिलिंग हे खास आकर्षण ठरतंय.
समुद्रा खालचं जग बघण्यासाठी पर्यटक गुंग झालेत. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सुंदर फेसाळणारे समुद्र किनारे आणि त्याच्या दिमतीला खमंग मालवणी जेवण. हे स्वर्ग सुख प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक सध्या कोकणात गर्दी करु लागलेत.
सिंधुदुर्गमधील तारकर्ली देवबाग तसेच मालवणसह जिल्ह्यातले सगळे समुद्र किनारे सध्या हाऊसफुल्ल झालेत. नोकरदारांना दिवाळंसणानं पाच दिवसांच्या सुटीची गिफ्ट दिली. त्यामुळे जिल्ह्यातले सगळेच हॉटेल्स फुल्ल झालेत.
स्कूबा ड्रायव्हिंग स्नोर्क्लिंग सोबतच तारकर्लीत आता पेरेसिलिंग सुरु झालंय. याच सर्वांचे रेट्स कमी आहेत त्यात मालवणी जेवणाचा बोनस मग काय पर्यटक आपल्या सुट्यांचा मनमुराद आनंद लुटताहेत.
अचानक पर्यटकांची कोकणाकडे पावलं वळल्यानं सिंधुदुर्गातील सर्वच हॉटेल्स फुल्ल झाले. त्यामुळे काही पर्यटकांना माघारी परतावं लागलं. मात्र पर्यटकांच्या या तोबा गर्दीनं सिंधुदुर्गातील अर्थकारणानंही उभारी घेतली आहे.