तात्काळ करण्याची गणेश भगतांची मागणी**
नवी मुंबई : नेरूळच्या राजकारणात महापालिकेच्या निवडणूकीत नेरूळ सेक्टर १६ हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही तब्बल १००० पेक्षा अधिक मताधिक्क्यांनी विजय मिळवित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत प्रकाशझोतात आल्या खर्या, पण नगरसेविका झाल्यावरही प्रभागातील नागरी समस्या निवारणात आक्रमकता दाखविल्याने नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या नावाची नेरूळ पश्चिमच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
नेरूळ सेक्टर १६ परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत यांनी सन २०१०च्या महापालिका निवडणूकीत पराभूत झाल्यावर या ठिकाणी भरीव स्वरूपात लोकोपयोगी कार्य करत जनसंपर्क वाढविला होता. स्थानिक भागात गणेशदादा भगतांचे कार्य आणि जनसंपर्क यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे शक्य झाले.
नेरूळ सेक्टर १६ मध्ये सहा मजली इमारतीचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. इमारतीसमोरील भूखंडावरही कचर्याचे ढीग तयार होत असून साफसफाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.
येथील महानगरपालिकेच्या शाळेसमोरील भूखंडावर इमारतीचे बांधकाम सुरू होते. सहा मजल्यापर्यंत काम झाल्यानंतर काही कारणास्तव बिल्डरने बांधकाम थांबविले. जवळपास ८ ते १० वर्षे अर्धवट अवस्थेमध्ये ही इमारत उभी आहे. पावसाचे पाणी इमारतीच्या छतावर साचत असल्यामुळे डासांची उत्पत्तीही होवू लागली आहे.तळमजल्यावर व समोरील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. स्थानिक नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. या भूखंडाची साफसफाई करावी अशी मागणीही केली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशदादा भगत यांनीही यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. या भूखंडावरील कचरा साफ न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लवकरात लवकर याविषयी योग्य कार्यवाही करण्याची मागणी नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी केली आहे.