नवी मुंबई : काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई रोजगार सेलच्यावतीने 14 नोव्हेंबर रोजी नेरूळ येथील रोजगार सेलच्या कार्यालयात मोफत फराळाचा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती रोजगार सेलचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
नेरूळ सेक्टर 2 येथील राजीव गांधी उड्डाणपुलानजिक रविंद्र सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात सांयकाळी 7 वाजता या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले असून नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रविंद्र सावंत यांनी केले आहे.