संपत शेवाळेंच्या दणक्याने एमएसईडीसीला आली जाग
नवी मुंबई : वाशी नोडमधील भाजपाचे स्थानिक नेते व नवी मुंबई महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांनी वाशीतील रहीवाशांना आलेल्या अवास्तव वीज देयकाबाबत एमएसईडीसी कार्यालयावर धडक देताच या परिसरातील विद्युत देयकांची चौकशी करण्याचे एमएसईडीसीच्या अधिकार्यांनी मान्य केले.
महापालिका प्रभाग ६३ मधील वाशी सेक्टर १,२ आणि १७ मधील रहीवाशांना अवास्तव वीज देयक येत असल्याने रहीवाशांसोबत भाजपाचे स्थानिक नेते व माजी नगरसेवक संपत शेवाळे यांनी बुधवारी थेट वाशीतील एमएसईडीसीच्या कार्यालयाला धडक दिली. एमएसईडीसीचे कार्यकारी अभियंता मुंगे यांच्याशी शिष्टमंडळाशी चर्चा करताना संपत शेवाळे यांनी रहीवाशांना अवास्तव वीज देयक येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. संपत शेवाळे यांनी समस्येचे गांभीर्य मुंगे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर या परिसरातील वीज देयकांची चौकशी करण्याचे व सोसायटीतील कोणा एका सदस्याला सोबत घेवून वीज मीटरचे रीडींग घेण्याचे मुंगे यांनी मान्य केले. वीज देयकाबाबत संपत शेवाळेंनी तातडीने सकारात्मक योगदान दिल्यामुळे रहीवाशांमध्ये शेवाळे प्रशंसेचा विषय बनले आहेत.