अकोला : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आधीच हुवालदिल झाले आहेत. अशातच आता कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या किडनी काढून विकण्याचा अमानुष प्रकार सावकारने केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
अकोल्यातील एका व्यक्तीने सावकारीतून चक्ककिडनी काढून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किडनी काढण्यासाठी पीडित व्यक्तीला श्रीलंकेतील एका रूग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्याची किडनी काढण्यात आली. त्यामुळे अकोल्यात आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अकोल्यात किडनी विक्रीच्या आणखी दोन घटना पुढे आल्या आहेत.
शांताबाई रामदास खरात (वय, ५०) यांच्यावर ३० हजार रूपयांचं कर्ज होतं. त्यांच्या किडनीची विक्री करून २ लाख रूपये देण्यात आले. तर देवानंद कोमलकर (वय ४०) यांच्यावर १ लाख रूपयांचं कर्ज होतं. त्यांच्या किडनीची ८ लाख रूपयांना विक्री करून त्यांना फक्त ४ लाख रूपये देण्यात आले. या दोघाचं ऑपरेशन औरंगाबाद येथे झालं.