आऊटसोर्सिगद्वारे होणार्या संभाव्य भरतीला काँग्रेसचा तीव्र विरोध
नवी मुंबई : आऊटसोर्सिग हे कंत्राटी संकल्पनेचेच सुधारीत नाव असल्याने याद्वारे महापालिकेत संभाव्य भरती न करता कायम तत्वावर कर्मचारी-अधिकारी भरती करण्याची लेखी मागणी काँग्रेसचे रोजगार-स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आपल्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कारभार सुनियोजितरित्या चालविला जात आहे. कामगारांचे परिश्रम व अधिकार्यांचे मार्गदर्शन याचा मिलाफ झाल्याने महापालिका प्रशासनाला राज्य व केंद्र स्तरावर महापालिका प्रशासनावर सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. ही बाब या नवी मुंबई शहरासाठी भूषणावह व अभिमानास्पद आहे. तथापि महापालिका प्रशासनात कंत्राटी तत्वावर कर्मचार्यांकडून आजही काम करवून घेतले जात आहे, ही कोठेतरी खटकण्यासारखी व मनाला न पटण्यासारखी बाब आहे. पालिका प्रशासन आस्थापनेवर केवळ 18 टक्के खर्च करत असून इतर खर्च विकासकामांवर करत आहे. विकासकामांना प्राधान्य देण्याचे मनपाचे धोरण प्रशंसनीय आहे. पण जनसेवा करताना कंत्राटीच्या गोंडस नावाखाली कामगारांचे शोषण, आर्थिक पिळवणूक करणे कितपत योग्य आहे याचेही यानिमित्ताने विचारमंथन होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाचा वाढता विस्तार, विकासकामांचा वाढता आवाका पाहता प्रशासनाला अद्यापि हजार ते दीड हजार कर्मचार्यांची आवश्यकता भासणार आहे. महापालिका प्रशासन आऊटसोर्सिगच्या माध्यमातून ही कर्मचारी भरती करणार असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. ही भरती प्रक्रिया कायम तत्वावर करण्यात यावी. आउटसोसिर्ंग हे कंत्राटी संकल्पनेचे सुधारीत गोंडस नाव आहे. काम करणार्या कामगाराची सेवा ही कायम झालीच पाहिजे. तो त्या कामगारांचा हक्क आहे. यापुढे प्रशासनाने नोकरभरती करताना कंत्राटी वा आऊटसोर्सिगच्या माध्यमातून न करता कायम तत्वावर कर्मचारी भरती करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आऊटसोर्सिगच्या पध्दतीने नोकरभरतीला आमचा विरोध असून प्रशासनाने आऊटसोर्सिगच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचा प्रयास केल्यास आम्हाला मनपा प्रशासनाच्या विरोधात कामगारहिताची जपणूक करण्यासाठी उग्र आंदोलन छेडावे लागेल तसेच न्यायालयाचेही दरवाजे ठोठावे लागतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी. कामगार हिताचा विचार करता आऊटसोर्सिगची प्रक्रिया कामगार भरतीकरता न वापरता कायम तत्वावरच कर्मचारी भरती पारदर्शकपणे भरती करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.