मुंबई : शाहरुख खान आणि काजोल यांचा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा दिलवाले या चित्रपटावर महाराष्ट्रानं बहिष्कार घालावा असं आवाहन मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं केलंय.
शाहरुख खाननं नुकतचं चेन्नईच्या पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात गेले ६ महिने दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केलाय.
पण शाहरुख खानानं राज्यातल्या शेतकर्याला कवडीची मदत केलेली नाही. त्याचा विरोध करण्यासाठी दिलवालेवर बहिष्कार घालावा असं मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांचं म्हणणं आहे.