नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईचे माजी उपमहापौर व प्रभाग १०९ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक अशोक गावडे यांनी आयोजित केलेल्या आधार कार्ड शिबिरास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
नगरसेवक अशोक गावडे यांच्या प्रभाग १०९ मधील सेक्टर ४२ मधील एसएस हायस्कूललगतच्या जनसंपर्क कार्यालयात व नेरूळ सेक्टर २८ मधील श्रीगणेश सोसायटीमधील जनसंपर्क कार्यालयात या आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत सेक्टर २८ मधील श्रीगणेश सोसायटी येथील जनसंपर्क कार्यालयात व १६ ते १९ डिसेंबर रोजी सेक्टर ४२ येथील एसएस हायस्कूललगतच्या जनसंपर्क कार्यालयात आधार कार्ड शिबिर भरविण्यात आले. आधार कार्डअभावी नागरिकांची होत असलेले गैरसोय पाहून त्यांना विनाकष्ट स्थानिक परिसरातच आधार कार्ड उपलब्ध व्हावे याकरता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिबिराचे आयोजक अशोक गावडे यांनी दिली.
२० व २१ डिसेंबर रोजी नेरूळ सेक्टर २८ येथील श्रीगणेश सोसायटीच्या कार्यालयात स्थानिक आग्रहास्तव दोन दिवस आधार कार्ड शिबिराचा कालावधी वाढविला असल्याचे आयोजक अशोक गावडे यांनी सांगितले.