मुंबई : भारतात सर्वप्रथम आल्यानंतर अभिनेता सलमान खानने माझे स्वागत केले होते. त्यामुळे त्याचे माझ्या हृदयात विशेष स्थान असल्याचे, अभिनेत्री सनी लिओनी हिने म्हटले आहे.
सनी लिओनी भारतात सर्वप्रथम सलमान खान सूत्रसंचालक असलेल्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आली. त्यानंतर तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. बिग बॉसमध्ये सलमानने सनीचे स्वागत केले होते. सनीचा २९ जानेवारीला मस्तीजादे हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.
सनी म्हणाली, की मी त्याची सर्वात मोठी चाहती आहे. बॉलिवूडमध्ये मला सर्वप्रथम सलमानने शुभेच्छा दिल्या होत्या. त्या सर्व आठवणी माझ्यासाठी विशेष आहेत. मला पुढे काय करायचे हे माहित नसताना त्याने मला प्रोत्साहन दिले होते. दबंग चित्रपटानंतर आमच्यात संपर्क झाला नसला तरी, तो एक चांगला व्यक्ती आहे. तो मला कधीही भेटला तरी ओळख दाखवतो. त्याने मला एकदा निमंत्रणही दिले होते, पण मी त्यावेळी देशाबाहेर असल्याने जावू शकले नव्हते. माझ्या आयुष्यात मला सर्वकाही मिळाले आहे आणि मी खूप आनंदी आहे.