ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातील भाईंदर पश्चिम भागातील उत्तन किनारपट्टीवर ओएनजीसी कंपनीने समुद्रात तेल सर्वेक्षणासाठी मच्छीमारांवर काही निर्बंध घातले आहेत.. या निर्बंधामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने स्थानिक खासदार राजन विचारे यांनी सुरु असलेल्या लोकसभेतील हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरवर चर्चा करून ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
उत्तन परिसरातील २५ किलोमीटरचा समुद्र किनारा असलेल्या या परिसरात मनोरी, गोराई, उत्तन चौक, तारोडी, डोंगरी ही गावे येत असून येथील लोकांचा मच्छीमारी हा एकमेव व्यवसाय असल्याने मच्छीमार दूरवर समुद्रात जाऊन मच्छी पकडत असे व ती विकून आपला उदरनिर्वाह करीत असताना ओएनजीसी कंपनीने समुद्रात पाच किलोमीटरच्या आतील क्षेत्रात मच्छीमारी करणेस अटकाव केल्याने त्यांना या भागात मच्छी मिळत नसल्याने व मच्छीमारीसाठी लागणारी सामुग्री , बोटीं दुरुस्ती व पेट्रोलसाठी येणारा हा सर्व खर्च वाढल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. इतकेच नव्हे तर ताब्यात असलेली किनारपट्टीपासून ७० समुद्री मैल क्षेत्रात सर्वेक्षणाच्या कामास सुरवात केली असल्याने जर विहिरी खोदण्याचे काम पूर्णत्वास गेल्यास लाखो मच्छीमारांवर उपाशी मरण्याची वेळ येईल.
सभागृहात चर्चा करीत असताना खा. विचारे यांनी नजरचुकीने मच्छीमारकडून हद्दपार झाल्याने तटरक्ष दलाने त्या नौकेवर गोळीबार केल्याने मच्छीमाराचा जीव गेला. यासारखी घटना पुन्हा घडू नये याकरिता ओएनजीसी कंपनीने सर्वेक्षणाच्या कामाच्या क्षेत्रात मच्छीमारांना सावध करणेबाबत काही निशाण फडकावत ठेवावे.
तसेच खा. विचारे यांनी या शून्य प्रहर मार्फत केंद्र सरकारकडे विनंती केली की या क्षेत्रातील मच्छीमारांची आर्थिक स्थिती व रोजगार संधी निर्माण करणेसाठी काही तरी ठोस पावले उचलवीत व त्यांच्या रोजी रोटीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तसेच त्यांचा रोजगार चालू राहण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग शोधणे, या सर्व बाबींचा विचार करून भाईंदर उत्तन बंदर विकसित करणे आवश्यक आहे.