• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2015

प्रभाग ८८ साठी राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी यांचा अर्ज दाखल

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ८८ साठी राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका नेरुळमधील प्रभाग क्रमांक ८८च्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिल्पा सुर्यकांत कांबळी यांनी नेरुळच्या प्रभाग कार्यालयात निवडणूक अधिकारी तृप्ती सांडभोर यांच्याकडे अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक अनंत सुतार, पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, जिल्हा महिला अध्यक्षा माधुरी सुतार, युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रा शिर्के, तालुकाध्यक्ष सर्वश्री रविंद्र इथापे, गणेश भगत, राजू शिंदे, संदिप सुतार, माजी उपमहापौर भरत नखाते, माजी उपमहापौर अशोक गावडे, नगरसेवक अशोक गुरखे, नगरसेवक गिरिश म्हात्रे, नगरसेविका तनुजा मढवी, नगरसेविका मोनिका पाटील, माजी नगरसेविका राजश्री कातकरी, नगरसेविका प्रज्ञा भोईर, नगरसेविका मनिषा भोईर, शशिकांत भोईर, नगरसेविका श्रध्दा गवस, नगरसेवक विशाल डोळस, समाजसेवक श्रीधर मढवी, अनिल लोखंडे, परिवहन समितीचे माजी सभापती चंद्रकांत आगोंडे, जयेंद्र सुतार, प्रदिप गवस आदींसह स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

**कांबळी यांचा विजय हीच मालादींना श्रध्दांजली**
शिल्पा कांबळी यांचा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांनी संजीव नाईक यांना या पोटनिवडणुकीविषयी प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या दुर्देवी आणि आकस्मित निधनानंतर ही पोटनिवडणुक लागली आहे. प्रभाग ८८मधील जनता सुज्ञ आणि संवेदनशील आहे. कांबळी यांना विजयी करुन मालादींचे प्रभाग विकासाचे स्वप्न येथील नागरिक पूर्ण करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या विकासाला नवी उंची दिली आहे. त्यामुळे भावनिक मुद्यांवर नव्हे तर विकास कामांवर नागरिक मतदान करतील, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याविषयी पत्रकारांनी विचारले असता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मात्र मागील सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर होती आणि विजयी झाली होती त्यामुळे हा प्रभाग राष्ट्रवादीचाच आहे.

** १०० टक्के विजयाची खात्री **
जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या पोटनिवडणुकीत १०० टक्के विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

** मालादींचे स्वप्न पूर्ण करू **
स्वर्गीय शशिकला मालादी यांचे प्रभाग विकासाचे स्वप्न पूर्ण करणार असून राष्ट्रवादीचा विजय ही त्यांच्यासाठी खरी श्रध्दांजली असेल, असे राकॉंच्या उमेदवार शिल्पा कांबळी म्हणाल्या.

Previous Post

भाईंदर उत्तन परिसरातील मच्छीमारांसाठी खा. विचारे यांची संसदेतील हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरवर चर्चा

Next Post

‘महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठेसाठी सिडकोने भुखंड उपलब्ध करुन द्यावेत’

Next Post

‘महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठेसाठी सिडकोने भुखंड उपलब्ध करुन द्यावेत’

दिघाप्रश्‍नी आमदार नाईक यांच्या मागणीला विधानपरिषदेत पाठबळ

थंडीचा जोर वाढल्याने मुंबई गारठली

थंडीचा जोर वाढल्याने मुंबई गारठली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com