पुणे : सुमारे तीन दशक सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याचा आज (बुधवार) सकाळी सात वाजता ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यासह सात जणांवर मोक्कातर्ंगत कारवाई झाली होती. त्यात तो अटक होता. नुकताच त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्याने खासगी रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी मागणीही न्यायालयात केली होती. न्यायालयाने ती फेटाळली होती.
सल्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आदिसह बावीस गुन्हे दाखल होते. मोक्काची कारवाईही झाली होती. बबलू माने याच्या खुनानंतर त्याच्यावर मोक्काची कारवाई झाली होती. सध्या तो बेड सोलमुळे झालेल्या जखमांनी त्रस्त होता. त्यावर उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.