नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने त्यांच्या ६० ते ९० मिनिटांच्या फ्लाईटमध्ये केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेतलाय. नव्या वर्षात एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान, या निर्णयाला आता धार्मिक रंग चढवले जातायत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे एअर इंडियाने असा निर्णय का घेतला असा सवाल उपस्थित केलाय.
दरम्यान, या विमान कंपनीने वेळेचे कारण पुढे केलेय. कमी वेळ प्रवासांच्या या विमानांमध्ये जेवळ देण्यासाठी वेळ कमी असतो. तसेच पॅसेंजरला अनेक व्हरायटीज द्यावी लागते. नॉनव्हेज खाणार्या व्यक्ती व्हेज खाऊ शकतात. मात्र जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना व्हेज जेवण गरजेचे असते. क्रूलाही यासाठी ३० ते ४० मिनिटे लागतात. यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलेय.
जून २०१५मध्ये लेह-दिल्ली फ्लाईटमध्ये सिंधु दर्शन फेस्टिवलमधून परतणार्या जैन पॅसेंजरना नॉनव्हेज देणार्या दोन कर्मचार्यांना एअर इंडियाने निलंबित केले होते.