नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अशोक गावडे यांनी आयोजित केलेल्या आधार कार्ड शिबिरात ३६८ नागरिकांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला.
आधार कार्ड काढण्यासाठी स्थानिक रहीवाशांची आजही होत असलेली गैरसोय लक्षात माजी उपमहापौर व नगरसेवक अशोक गावडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या एस.एस.हायस्कूललगतच्या जनसंपर्क कार्यालयात व नेरूळ सेक्टर २८ येथील श्रीगणेश सोसायटीत आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात गावडे यांच्या प्रभागातील ३६८ नागरिकांनी आधार कार्ड शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन स्वत: अशोक गावडे यांनी केले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी व श्रीगणेश सोसायटीतील पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.