नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेल्या पाहणीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छ शहरात देशात तृतीय व राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे मानांकन लाभले आहे. हे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई मिशन अंतर्गत महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये नागरिकांच्या सक्रीय सहभागावर भर देण्यात येत आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून नागरिकांच्या सहभागाने व्यापक प्रमाणात स्वच्छताविषयक उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नागरिकांना सुलभ होतील व शहर स्वच्छतेत भर घालतील अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
याच अनुषंगाने नववर्षाच्या आरंभदिनी एक नवी सुरूवात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात येत असून सध्याची जनमानसांमधील सोशल मिडीया त्यातही विशेषत: व्हॉट्स प वापराची लोकप्रियता लक्षात घेता महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहर स्वच्छतेसाठी ९७६९८९४९४४ हा व्हॉटस् प मोबाईल क्रमांक नागरिकांच्या सोयीसाठी जाहीर केला आहे. नागरिक या क्रमांकावर आपल्या स्वच्छतेविषयीच्या तक्रारी, मौल्यवान सूचना छायाचित्रांसह पाठवू शकतात अशी माहिती देत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी यामधून नागरिकांना अपेक्षित आवश्यक ठिकाणी अधिक तत्पर व समाधानकारक सेवा उपलब्ध होईल आणि याव्दारे शहर स्वच्छता कार्यास गतिमानता येईल असा विश्वास व्यक्त केला. शिवाय ही व्हॉटस् प सेवा २४ ु ७ उपलब्ध असणार असल्याने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने कृतीशिलता वाढीस लागणार आहे.
शहर स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून व्हॉट्स प मोबाईल क्रमांक सुविधेमुळे स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक उत्तम काम होईल व याकामी नागरिकांचे अनमोल सहकार्य अपेक्षित आहे. विशेषत्वाने ओला व सुका कच-याचे नागरिक पातळीवरच वर्गाकरण व्हावे ही भूमिका असून यादृष्टीने शहरातील काही मोठ्या सोसायट्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात कचरा वर्गीकरण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र यात सर्वांचाच व्यापक सहभाग अपेक्षित असून इतरही सोसायट्या, वसाहती, गृहसंकुले यांनीही आपल्या सदस्यांना एकत्र आणून सामाजिक कर्तव्याच्या भावनेने ओला व सुका कचरा निर्माण होतो तिथेच म्हणजे नागरिक पातळीवरच वर्गीकृत करावा असे आवाहन करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी आपल्या नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन उंचाविण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले सर्वोतोपरी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.