नवी मुंबई : आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टतर्फे सोमवार, दि. ११ जानेवारी रोजी नेरूळमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत व माजी नगरसेविका इंदूमती भगत यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डीवायपाटील रूग्णालयाच्या सहकार्याने नेरूळ सेक्टर १२ मधील एनआरबी विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर संपन्न झाले असून या कार्यक्रमात रक्तदान करण्याकरता मोठ्या संख्येने आलेल्या रक्तदात्यांचे नामदेव भगत यांनी आभार मानले आहेत. रूग्णालयात असलेला रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी नामदेव भगत यांनी व्यक्त केले आहे.