नवी मुंबई : विद्युत डीपी असो, वायर शॉर्ट सर्कीट असो वा अन्य कोणत्याही कारणाने गृहनिर्माण सोसायटीत कोणत्याही क्षणी आग लागण्याची शक्यता असते. अशा वेळी जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांनी अग्निशमन व्यवस्थेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केले.
नेरूळ सेक्टर ६ येथे प्लॉट १५ वरील शिवम सोसायटीतील विद्युत डीपीमध्ये वायरी व केबल शार्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी नगरसेविका सुजाता पाटील व प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी स्थानिक रहीवाशांशी नगरसेविका सुजाता पाटील यांनी सुसंवाद साधला.
महापालिकेने यापूर्वीच गृहनिर्माण सोसायट्यांना अग्निशमन व्यवस्था प्रतिबंधात्मक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिलेले असतानाही गृहनिर्माण सोसायट्या पालिकेच्या या जनजागृतीकडे कानाडोळा करत आहेत. याबाबत लोकांमध्ये अग्नीशमनची जनजागृतीबाबत लवकरच सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिराचा आयोजन करण्याचा मानस नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी बोलून दाखविला.
शिवममधील डीपीतील आग विझविण्याकरता रेती टाकण्यात पुढाकार करणार्या तेजस मुनवर व ज्येष्ठ नागरिक मारूती बोरकर यांच्या कार्याची नगरसेविका सुजाता पाटील यांनी प्रशंसा करत सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे आजच्या समाजव्यस्थेत दुर्घटना लवकर आटोक्यात येत असल्याचे सांगितले.
डीपीच्या ठिकाणी भेट देत आगीची माहिती नगरसेविका पाटील यांनी जाणून घेतली.