मुंबई – हा देश सोडण्याच्या विचार नव्हता, भारतात जन्मलोय आणि भारतातच मरणार असल्याचे मत असहिष्णुत्येच्या टिप्पणीवरून वादात अडकलेल्या अमीर खानने व्यक्त केले आहे.
‘रंग दे बंसती’ या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात तो बोलत होता. अमीर म्हणाला की, कामानिमित्त परदेशात असलो तरी दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस मला करमत नाही. कधी एकदा देशात यावे वाटते. या देशावर माझे प्रेम आहे. काहींनी मला समजून घेतले आहे तर काहींनी समजून घेतले नाही.
जे दु:खी झाले आहेत, त्यांच्या भावना समजू शकतो. देश सोडण्याचा विचारही केला नाही, असे तो म्हणाला.
मागील नोव्हेंबर महिन्यात रामनाथ गोयंका पुरस्कार कार्यक्रमात अमीर खानने सहिष्णुतेवर टिप्पणी केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्याच्यावर टीकेचे झोडही उटवली. अमीरची ’अतिथी देवो भव’मधूनही उचलबांगडी करण्यात आली.