नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी प्रभाग क्रमांक ९६ नेरूळ मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले व लहान मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.़
ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी अष्टविनायक सोसायटीमध्ये त्यांच्यासमवेत विमल गांडाळ, प्राजक्ता प्रभु, छाया चव्हाण, उषा सावंत, संगीता दगाबाज, समाजसेवक संजय पाथरे, अशोक गांडाळ, संतोष बोडके, चंद्रकांत महाजन, संतोष शिंदे , प्रमोद प्रभु उपस्थित होते.