राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
नवी मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ आज वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानावर साजरा झाला. महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झाले. उपस्थित मान्यवर, नागरिक आदिंना श्रीमती विद्या ठाकूर यांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या समारंभास आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, कोंकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अप्पर आयुक्त कोकण विभाग कैलास जाधव, माजी पोलीस आयुक्त रामराव वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवी मुंबई शीघ्र कृती दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पुरुष पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक पथक, नवी मुंबई अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, बुलेट प्रुफ वाहन, मार्क्स मॅन वाहन, आर.आय.व्ही. वाहन, बी.डी.डी.एस. वाहन, वरूण वाहन, अग्निशमन दल वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक आदिंनी संचलनाद्वारे प्रमुख अतिथी श्रीमती विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्र.१५ व आय.सी. एल. मोनामी शाळा तुर्भे या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी समूहगीत सादर केले. महानगर पालिका शाळा क्र. ६ व ७, ज्ञानपुष्प विद्यालय सीबीडी, बेलापूर, महात्मा गांधी मिशनचे स्कूल, नेरूळ, रामचंद्र फकीर नाईक विद्यालय, कोपरखैरणे, भारती विद्यापीठ प्रशाला, सी.बी.डी. बेलापूर, ज्ञान विकास हायस्कूल कोपरखैरणे, पीपल्स एज्युकेशन सो. विद्यालय, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई हायस्कूल, वाशी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना प्रोत्साहन दिले.
उल्लेखनीय व विशेष सेवेबद्दल पो.नि. सुनिल बलभिम दरेकर, पो.नि. समीर साळुंखे, स.पो.नि. रामचंद्र हरिशचंद्र चोपडे, स.पो.नि. राजेश शिवशिंग जाधव, स.पो.नि. अदिनाथ आनंद गावडे, स.पो.नि.श्रीमती शिल्पा दादाभाऊ पवार, स.पो.नि. संजय लक्ष्मण सुर्यवंशी, स.पो.नि. आनंद नारायण पाटील, स.पो.नि. दादासाहेब साहेबराव पवार, स.पो. नि. सचिन शांताराम हिरे, स.पो.नि. नंदकुमार मोहनराव कदम, स.पो. नि. बबन मारुती आव्हाड, स.पो. नि. राहुल सोमनाथ खताळ, स.पो.नि. वासुदेव भिमराव मोरे, स.पो.नि. महेंद्र बाबुराव वाघ, स.पो.नि. संदिप बाळु शहाणे,स.पो.नि. गणेश व्यंकटराव कराड, स.पो.नि. समीर राजेंद्र कांबळे, स.पो.नि. स्वप्नील तेजराव इज्जपवार, स.पो.नि. अमोल प्रकाश कोरड, स.पो. नि. दिपक वसंत डोंब, स.पो. नि. संभाजी नारायण गुरव, स.पो. नि. नितीन मुकेश बडगुजर, स.पो.नि. रविंद्र हरिभाऊ अहिरे, स.पो.नि. रामचंद्र छबुराव पालवे, पो.उपनि. संभाजी गोरखनाथ कटारे, पो.उपनि. सचिन रंगनाथ इंगळे,पो.उपनि. संतोष भागवत चव्हाण, पो.उपनि.अजित सुनिल साबळे, पो.उपनि. गौतम तावडे, पो.उपनि. गौतम सुरवाडे, यांचा या कार्यक्रमात महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास उपायुक्त (सामान्य) राजीव निवतकर, उपायुक्त (महसूल) भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (रोहयो) मकरंद देशमुख, उपायुक्त (आस्थापना) रविंद्र शिंदे, उपायुक्त (पुर्नवसन) बाळासाहेब घेवारे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. तरुलता दानके यांनी केले.