हावेरी : कर्नाटकाच्या एका मंत्र्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवंतपणीच श्रद्धांजली वाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोहर तहसिलदार असे पवारांना श्रद्धांजली वाहणार्या मंत्र्याचे नाव आहे. ते प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी त्यांनी पवारांच्या निधनामुळे देशाचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थाना देखील केली. त्यांनी केलेल्या कामाची त्यांनी यावेळी प्रशंसा देखील केली.
दरम्यान, आपल्याला जिवंतपणीच श्रद्धांजली देण्यात आल्याची बातमी पवारांना समजली. त्यांनी याला खेळीमेळीत घेत, कुणी जिवंत माणसाला श्रद्धांजली वाहिल्यास त्याला दिर्घायुष्य मिळते असे ते म्हणाले. शरद पवार यांची प्रकृती एकदम व्यवस्थित असून त्यांनी उद्या रजा देण्यात येईल अशी माहिती रुबी रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय पठारे यांनी दिली आहे.