नवी मुंबई : वाशी येथील मिनिसिशोर येथे सोमवारी भाजपाच्या बेलापुर मतदारसंघातील आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि संबंधीत अधिकार्यांसोबत पाहणी दौरा केला.
या पाहणी दौर्यांमध्येे मिनि सिशोर परिसरात नवी मुंबईकरांना कशा प्रकारे जास्तीत जास्त सुविधा मिळतील या दृष्टीने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. वाशी मिनिसिशोर येथील स्वच्छता, सीसीटीव्ही, कॅमेरे बसवणे, परिसरात बोटींगची सुविधा देणे, पालिकेचे खाद्यपदार्थ विक्रेते असणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विंरगुळा केंद्र जॅगिंग टॅक, परिसरात हिरवळ कशा प्रकारे निर्माण होईल, अशा विविध सुविधासंदर्भात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सोमवारी आयुक्त दिनेश वाघमारे तसेच संबंधीत अधिकार्यांसोबत वाशी मिनिसिशोर येथे पाहणी दौरा केला.
यावेळी उपस्थित पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबईच्या स्मार्ट सिटीसाठी या स्थळाची कश्या प्रकारे विकास करता येईल याकडे लक्ष देणार असल्याच सांगितले. तसेच स्थानिक नागरिकांनी देखील येथील समस्या जाणून घेतल्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
यावेळी पालीकाचे आयुक्त दिनेश वाघमारे, मोहन डगावकर, डॉ. पत्तीवर, बाबासाहेब राजळे, सुभाष इंगळे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.