ठाणे : टिटवाळा नजीकच्या मानिवली गावालगतच्या ठाकूरपाड्यावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून टिटवाळ्यातील ‘एक दिलासा’ आणि ठाणे येथील ‘आयडे सेवा संस्था’ या संस्थांच्यावतीने या पाड्यावरील आदिवासी मुलांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. कपडे घेऊन पाड्यावर आलेल्या मोटारसायकल पाहून पाड्यावरील मुलांनी आनंदात एकाच कल्ला केला.
‘एक दिलासा’ संस्थेचे अजय शेलार ,योगेश पाटील,दर्शन डावरे यांनी आम्ही दिलासाच्या माध्यमातून अनेक लहान मोठे उपक्रम राबवत असतो. यातून फार मोठे समाधान मिळते केवळ झेंडा लावून देशप्रेम दाखवण्यापेक्षा प्रत्येकाने अशा सामाजिक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. हीच खरी देशसेवा आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
प्रजासाताक म्हणजे सुट्टीचा दिवस, ही भावना अनेकांची बनत चालली आहे. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश आमच्या परीने देत असतो. अशा भावना ‘आयडे सेवा संस्थे’च्या महेंद्र फल्ले यांनी व्यक्त केल्या.