नवी दिल्ली : ६७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी निवडक लोकांसोबत लंचचा आस्वाद घेतला. या मान्यवरांच्या यादीत बॉलिवूडची आघाडीचे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचाही समावेश होता. या कार्यक्रमात ऐश्वर्या फॅशन डिझायनर स्वाती-सुनैना यांनी डिझाइन केलेल्या रेड-पिंक कलरच्या बनारसी साडीत अवतरली. रेड-पिंक साडी, पिंक लिपस्टिक, केसांचा अंबाडा आणि गोल्डन ज्वेलरीत अवतरलेल्या ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचे हे रुप बघून उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या.
यावेळी ऐश्वर्याने फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि सिनेमांवर चर्चा केली. ऐश्वर्या राय-बच्चन मागील काही वर्षांपासून फ्रान्समध्ये होणार्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होत आहे. ऐश्वर्याला २०१२ मध्ये फ्रान्स सरकारने ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स ऍण्ड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
ऐश्वर्यासोबतच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, निर्माता आदित्य चोप्राने फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांची भेट घेतली. ओलांद यांच्यासोबत लंचचे अनेक सेलब्सला इन्व्हिटेशन मिळाले आहे. फ्रेंच वंशाची ऍक्ट्रेस कल्कि कोचलिनला देखील लंचला इनव्हाइट करण्यात आले होते.