पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्यांना आठवड्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र पवारांनी विश्रांतीसाठी वेळ नसल्याचे सांगितले. यावर ते म्हणाले, विश्रांतीचं बघू, दोन महिने मला एकही सुटी नाही.
अतिकामामुळे पवार यांना थकवा आला होता. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालच त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून सांगितले होते.
डिसचार्ज मिळताचे ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. डॉक्टरांनी आठवड्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याचे काय करायचे ते बघू. मला पुढील दोन महिने सुटीसाठी वेळ नाही, असे पवार म्हणाले आहेत.