अध्यक्षीय भाषणाच्या छापल्या हजार प्रती
पुणे : अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापण्यावरून साहित्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि साहित्य महामंडळ यांच्यात वाद सुरू होता. तो अखेर साहित्य महामंडळाने अध्यक्षीय भाषणाच्या १००० प्रती छापून मिटविला आहे. यामुळे सबनिस यांनी आजपासून सुरू करणारे उपोषण मागे घेतले आहे.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी संमेलनातील अध्यक्षीय भाषणांची पुस्तिका छापली नाही, तर २७ जानेवारीपासून पत्नीसह पुण्यातील मराठी साहित्य परिषदेबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. ही पुस्तिका छापण्यासाठी त्यांनी महामंडळाला २६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, ही पुस्तिकेच्या १००० प्रती छापल्या. त्याच्या २५ प्रतीही सबनीस यांच्या घरी पोहोचविण्यात आल्या. त्याबद्दल त्यांनी साहित्य महामंडळाचे आभार मानले आहेत.