मुंबई : मागील काही दिवसांपासून शनी शिंगणापूरच्या चौथर्यावर महिलांच्या प्रवेशावरुन सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलकांनी जबरदस्ती प्रवेश करण्याची भाषा केली होती. पण पोलिसांनी हस्तक्षेप करुन या आंदोलकांना ताब्यात घेतले.
महिलांनी लिंगभेदाविरुद्ध आणि चौथर्यावर प्रवेश मिळवण्यासाठी चालवलेल्या या आंदोलनाला आता आध्यात्मिक गुरू रविशंकर यांनी सहमति दर्शवली आहे. शास्त्रांमध्ये महिला भक्तांना मंदिरात प्रवेश न देण्याबद्दल कुठेही उल्लेख नाही यावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रवेशावरुन सुरू असलेल्या या आंदोलनाला त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.