ठाणे : देवनार कचरा डेपो मधे लागलेली आग अजूनही धगधगतच आहे. अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थिचे प्रयत्न करत आहे. हवा ज्या दिशेला जात आहे त्या दिशेला धुराचे लोट जात आहेत. आज पश्चिम दिशेला हवा वाहत असल्याने घाटकोपर, असल्फा, साकीनाका विक्रोळी या भागावर सकाळ पासून धुराचे साम्राज्य दिसत आहे.
ही आग केव्हा आटोक्यात येईल हे जरी सांगता येत नसले तरी अग्निशामक दल अहोरात्र आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
यातून एक गोष्ठ समोर येत आहे की, महापालिका असो की राज्य सरकार असो, या आगीबाबत किती संवेदनशील आहे.