सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : प्रभाग दौरे, आमदार आपल्या दारी अशा उपक्रमांतून थेट संवाद साधून आमदार संदीप नाईक जनतेच्या समस्या सोडवित असतात. याच भूमिकेतून त्यांनी जन संवाद हा अभिनव उपक्रम सुरु केला. 13 सप्टेंबर 2015 रोजी ऐरोली विभागाकरिता हा उपक्रम प्रथम त्यांनी आयोजित केला होता. त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार 7 फेब्रुवारी रोजी जन संवाद हा उपक्रम घणसोली भागाकरिता होणार आहे.
घणसोलीतील सेक्टर 7 घरोंदा परिसरात असलेल्या न्यू बॉम्बे सिटी स्कूलमध्ये हा जनसंवाद उपक्रम सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये शासकीय आणि निमशासकीय विभागांशी संबंधीत लेखी समस्यांचे निवेदन नागरिकांना सादर करता येईल. जन संवादसाठी येताना निवेदनाच्या तीन प्रती नागरिकांनी सोबत आणावयाच्या आहेत. महापालिका, महावितरण, सिडको, एमआयडीसी, पोलीस, महानगर गॅस इत्यादी शासकीय आणि निमशासकीय विभागाचे अधिकारी या जन संवाद उपक्रमात उपस्थित राहणार आहेत. ज्या समस्यांची सोडवणूक उपक्रमादरम्यान करणे शक्य आहे, त्यासंबंधीची कार्यवाही लगेचच करण्यात येणार असून उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9029800070 किंवा 9022841212, या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती असताना सभापती आपल्या अंगणात हा जनतेशी थेट संपर्क साधणारा उपक्रम आ. नाईक यांनी यशस्वीपणे राबविला होता. त्यानंतर आमदारपदी विराजमान झाल्यावर आमदार आपल्या प्रभागात हा उपक्रम सुरु केला. आमदारकीच्या दुसर्या टर्ममध्ये देखील सातत्याने या उपक्रमाचे आयोजन सुरु असून त्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कार्य ते करीत आहेत. याशिवाय विविध विभागांशी संबंधित अधिकार्यांच्या बैठका वेळोवेळी आयोजित करुन नवी मुंबईमध्ये विविध नागरी सोयी सुविधांची निर्मिती करणे आणि या विभागांशी संबंधित जनतेच्या प्रश्नांचा निपटारा आमदार नाईक करीत असतात.