सॅन फ्रान्सिस्को – दहशतवाद्यांशी संबंधित असलेली, तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणारी १ लाख २५ हजारपेक्षा अधिक खाती बंद करण्यात आल्याचे ट्विटरने जाहीर केले आहे.
ट्विटर‘च्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी टीम‘ने याबाबत ट्विटर‘द्वारे माहिती दिली आहे. गेल्या ७ महिन्यांपासून दहशतवादाला प्रोत्साहन देणारी १ लाख २५ हजारपेक्षा अधिक ट्विटर‘ खाती आम्ही बंद केली आहेत,‘ अशी माहिती कंपनीने दिली आहे. ऑनलाईन कृत्यांद्वारे हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्यांवर नजर ठेवण्याचे आवाहन अमेरिकेसह जगातील काही देश सोशल मीडिया कंपन्यांना करत असतात.
दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटर‘च्या होणार्या वापराचा आम्ही नेहमीच निषेध करतो. ट्विटर‘वर संशयास्पद कृती आढळून आली तर, आम्ही खाते बंद करतो, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त वेगाने कारवाई करता यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही कंपनीने सांगितले.