मुंबई : मुक्या प्राण्यांवर माणसांकडून अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी कायदे करण्यात आले आहेत. मात्र काही फरक पडत नसल्याचे एक भयानक उदाहरण मुंबईत पुढे आले आहे. येथे एका माकडाला पकडून त्याला अमानुषपणे बांधून ठेवण्यात आले. नुसतेच बांधले नाही तर त्याचे हात मागे करकचून बांधण्यात आले. परिसरात धुडगूस घालत असल्याच्या कारणावरुन या माकडाला पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकांच्याकडून तक्रारी आल्यानंतर माकड पकडणार्या बोलावून घेऊन या माकडाला जेरबंद करण्यात आले. सहा महिने हे माकड लोकांना त्रास देत होते. घरात घुसून अन्न पळवणे, दुकानातील उशा पळवणे असे प्रकार हे माकड करत होते.
सायन भागात अशा प्रकारची तीन-चार माकडे त्रास देत होती. त्यांना कशाचेही भय वाटत नव्हते. सर्रास घरात घुसणे, वस्तूंची नासधूस करणे. त्या पळवणे असे प्रकार वाढले होते. स्थानिक नगरसेवकांच्या कानावर ही गोष्ट त्रासलेल्या रहिवाशांनी घातली. माकड पकडणार्याला बोलावून आणल्यानंतर त्याने फळांचे आमिष दाखवण्याचा सापळा रचला. त्यानंतर या माकडाला पकडले. त्याला पिंजर्यात घालण्यापूर्वी अत्यंत वाईट पद्धतीने बांधण्यात आले होते. दरम्यान या माकडाला उत्तर मुंबईतील वनभागात सोडण्यात आले आहे.