: हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या शुक्रवार-शनिवारी हार्बरवर घेतला जाणारा विशेष ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत येणार आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी हा ब्लॉकच रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
१३ फेब्रुवारीपासून मुंबईत ‘मेक इन इंडिया’चा भव्य कार्यक्रम सात दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदीसह अनेक उद्योजक, तसेच विविध देशांचे प्रतिनिधी व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहे. आहेत. त्यामुळे अशावेळी ब्लॉक घेतल्यास मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
लवकरच हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या लोकल चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्याचं काम केलं जाणार आहे. या कामांसाठी १२ आणि १३ फेब्रुवारीला हार्बर रेल्वेवर विशेष ब्लॉक घेतला जाणार होता. मात्र, आता तो रद्द करण्यात आला आहे.