आजपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा येथील अमृतांजन ब्रीज ते खंडाळा बोगदा या ३०० मीटर अंतरावर डोंगराला बोल्टिंग करून जाळी लावण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एक्सप्रेस वे च्या तीन पैकी एक लेन २२ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत १९दिवस बंद राहणार आहे.त्यामुळे मुंब्र-पुणे प्रवास करणा-यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे, तरी उर्वरित दोन लेनवरील वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबई पुणे हा जुना मार्गही या कालावधीत खुला असेल अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. दोन दिवसापूर्वी खंडाळ्याजवळ तेलाचा टँकर उलटल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती.