दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या कार्यालयात एका इमेलद्वारे अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली असल्याचे समजते.धमकीनंतर लगेचच सरकारच्या गृहविभागाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्याची सुचना पोलिसांना दिली आहे.इमेलमध्ये आपण शस्त्रांची जमवाजमव करत आहोत असं म्हटलं असून केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.