: प्रवाशांच्या ट्वीटची तातडीने दखल घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा चंगच रेल्वे मंत्रालयाने बांधला आहे. अजीमाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या एका महिलेने पाण्याच्या बाटलीचे वाढीव दर आकारत असल्याचा ट्वीट केला नि आश्चर्य म्हणजे विभागीय रेल्वे व्यवस्थापकच पाण्याची बाटली घेऊन हजर झाले.अजीमाबाद एक्स्प्रेसच्या एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास करणार्या स्वाती यांनी पाण्याच्या बाटलीची छापील किंमत १५ रुपये असूनही २० रुपये आकारले जात असल्याचा ट्वीट केला. रेल्वे मंत्रालयाने स्वाती कुमारी यांच्या ट्वीटची दखल घेऊन अधिक तपशील द्यावेत, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अलाहाबादमध्ये खुद्द डीआरएम म्हणजे विभागीय रेल्वे व्यवस्थापकच १५ रुपयांची पाण्याची बाटली घेऊन आले.स्वाती यांनी पाण्याची बाटली विकत घेतल्यानंतर रेल्वे मंत्र्यांचे ट्विटरवरुन आभारही मानले. दुसरीकडे अलाहाबाद रेल्वे मंडळाने रेल नीरसाठी अतिरिक्त पैसे वसूल करणार्या विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी प्रवाशांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन विक्रेते अवाजवी शुल्क आकारत असल्याचं अनेकदा ऐकायला मिळतं.