नवी मुंबई शहराला तीस किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा आहे. या खाडी किनाऱ्याला दाटून खारफुटीचे जंगल लाभले आहे. मात्र, आजतागायत या खाडीचा विकास करण्यात आला नाही. नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य आहे. या प्रवेशद्वाराचा चेहरा आता बदलणार आहे. नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी गावाचे पर्यटनस्थळ तयार केले जाणार आहे.गावाच्या परिसरातील खाडीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. खारफुटीच्या जंगलाचा वापर करून इको टुरिझम केले जाणार आहे. आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी खाडी किनाऱ्याचा दौरा केला. वाशी, नेरूळ, दिवाळे, कोपरखैरणे, ऐरोली खाडीकिनारी चौपाटी करण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिका करणार आहे. या प्रवेशद्वारावर बोटींग क्लब तयार करून मुंबई, ठाणे, अलिबाग येथे जल वाहतूक सेवा सुरू करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे या खाडीकिनारी बोट स्टेशनही उभारलं जाणार आहे.