गाडी चालवताना मोबाईलवर बोलणार्या वाहनचालकानं महिला पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.शिवीगाळ करणार्या शशीकांत या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टानं त्याला एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.वाहनचालक शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात असलं तरी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी त्याचा साफ इन्कार केला आहे.गुरुवारी सकाळी ठाण्यातल्या नितीन कंपनी जंक्शनजवळ हा वाहनचालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. त्याच्यामागे गाड्यांची रांग लागत असल्यानं तिथे असलेल्या महिला पोलिसानं त्याला हटकलं आणि पुढे जाण्याची विनंती केली. मात्र पुढे जाण्याऐवजी कारचालकानं पोलीस महिलेला शिवीगाळ केली. तसंच हातही उगारला होता.