जनविकास प्रबोधिनीचा उपक्रम
जल्लोष मराठी साहित्याचा
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मनसेप्रणित जनविकास प्रबोधिनीतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘जल्लोष मराठी साहित्याचा’अर्ंतगत पुस्तक प्रदर्शन व विक्री यात आतापर्यत दीड लाख रूपये किंमतीची मराठी भाषेची पुस्तके विकली गेली आहे. अखेरच्या दोन दिवसामध्ये अजून एक लाख रूपये किंमतीची पुस्तके विकली जाण्याची शक्यता जनविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष व मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईकरांमध्ये मराठी पुस्तकांविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने जनविकास प्रबोधिनीच्या वतीने ‘जल्लोष मराठी साहित्याचा’अर्ंतगत पुस्तक प्रदर्शन व विक्रीसप्ताह उपक्रम वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. २२ फेब्रुवारीला सुरू झालेला हा पुस्तक प्रदर्शन व विक्री कार्यक्रम २८ फेब्रुवारीपर्यत चालणार आहे. सकाळी १० ते रात्री १० या वेळेमध्ये आयोजित या कार्यक्रमात नवी मुंबईतील राजकीय, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.
मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक सतीश तांबे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, मनसेचे पदाधिकारी अनिल शिदोरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. मनविसेचे अध्यक्ष ऍ. आदित्य शिरोडकर, मनसेच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता, शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय नाहटा, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, मनपा सह आयुक्त दिवाकर समेळ, उपायुक्त चाबुकस्वार, सभापती गिरीश म्हात्रे, क्रिडा सभापती प्रकाश मोरे, आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, नाटककार रवी वाडकर, बालरंग भूमीचे श्रीहरी पवळे, स्त्री मुक्ती चळवळीच्या व ृषाली मगदूम,लेखक अजित मगदूम, मनसे सचिव प्रमोद पाटील यांच्यासह विविध कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शहरातील डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने दररोज प्रदर्शनात सहभागी होत आहे. गुरूवारी ४० हजार रूपयांची तर शुक्रवारी ४६ हजार रूपयांची पुस्तक विक्री झाली. अखेरच्या दोन दिवसामध्ये किमान एक ते सव्वा लाख रूपयांची पुस्तक विक्री होण्याची शक्यता गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेची शहर कार्यकारिणी, मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम करताना पहावयास मिळत आहे.