माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ.मुंबईः महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापुर्वी न्यायालयाने भुजबळ यांची दोन दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत रवानगी केली होती.
ती संपल्यानंतर भुजबळांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. भुजबळ यांनी प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केली होती. त्यामुळे जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती.