-
मुंबई, – जालना येथे स्वतंत्र मराठवाडाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात उमटलेले पडसाद आणि अणेंविरोधात तयार झालेल्या वातावरणासमोर झुकून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेयांनी अखेर मंगळवारी सकाळी पदाचा राजीनामा दिला. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास अणेंनी राजभवनात जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. आपल्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अणेंनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.शिवसेना नेते मात्र अणेंच्या केवळ राजीनाम्याने समाधानी नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे