सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : भगवती महिला मंडळाच्यावतीने शनिवार, दि. २६ मार्च रोजी नेरूळ सेक्टर ६ परिसरात शिवजंयती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, विराधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, उपशहरप्रमुख गणपत शेलार, शहरप्रमुख विजय माने, महिला जिल्हा संघठक रंजना शिंत्रे, महिला शहर संघठक रोहीणी भोईर आदी उपस्थित राहणार आहेत.
सांयकाळी ६ वाजता दुर्गा माता भाजी मंडई येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमत्रंक समुद्रा पाटील, शिवजंयती उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजंयती सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख दिलीपदादा आमले यांनी केले आहे.
नेरूळ सेक्टर ८ मध्ये सिंदूर रिक्षा स्टॅण्डवर महाराष्ट्र शिववाहतुक सेनेकडून शिवजंयती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेलापुर विधानसभा शिववाहतुक सेनेचे अध्यक्ष दिलीपदादा आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता या सोहळा साजरा होणार आहे. या कार्यक्रमात रिक्षा-टॅक्सींना मोफत पीयूसी करून दिली जाणार आहे. नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा केला जात असून कार्यक्रमासाठी हनुमंत शिणगारे, गणेश कदम, महादेव खरात, प्रविण ढगे, पवन लोखंडे, सतीश लिमकर आदी परिश्रम करत आहेत.