सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : कामगार नेते रविंद्र सावंत यांची इंटकच्या (राष्ट्रीय मजदूर काँग्रेस) नवी मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी होळीच्या दिनी इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी त्यांना नवी मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले आहे.
कामगार संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कंत्राटी व कायम कामगारांच्या समस्यांना वाचा फोडत त्यांना प्रशासनदरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयास केला आहे. महापालिका प्रशासनाकडून मागासवर्गिय अधिकार्यांना वर्षानुवर्षे पदोन्नतीपासून कसे जाणिवपूर्वक वंचित ठेवले जात आहे, या विविध घटनांना पालिका प्रशासन ते मंत्रालयादरम्यान पाठपुरावा करून उजेडात आणण्याचे काम रविंद्र सावंत यांनी केलेे आहे.
गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते पक्षसंघटनेत कार्यरत असून काँग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. इंटकच्या नवी मुंबई अध्यक्षपदी रविंद्र सावंत यांची नियुक्ती झाल्याचे समजताच कामगार क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.