नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवार, दि. 26 मार्च रोजी नेरूळ, सेक्टर 28 मध्ये महिलांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सांयकाळी 5 ते 7 पैठणी महोत्सव, 7 ते 7.30 ज्येष्ठ महिलांचा सत्कार, 7.30 ते 8.30 गोडवा महाराष्ट्राचा, सांयकाळी 8.30 ते 10 स्नेहभोजन असे या महिला स्नेहसंमेलनाचे स्वरूप असून या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, नवी मुंबई मनपाच्या स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेविका रूपाली भगत, सुजाता पाटील, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, निर्मला गावडे उपस्थित राहणार आहेत.
प्रभाग 98 व प्रभाग 109 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेरूळ सेक्टर 28 मधील श्रीगणेश सोसायटीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला अध्यक्षा सुलभा मोकाशी, सायली चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये प्रभाग 98 व प्रभाग 109 तसेच नेरूळमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबईचे माजी उपमहापौर स्थानिक नगरसेवक अशोक गावडे, उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती आणि स्थानिक नगरसेविका सपना गावडे-गायकवाड यांनी संयुक्तपणे केले आहे.