मुंबई : स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहणा-यांना नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग होणार आहे.कारण रेडी रेकनरच्या दरात सरासरी सात टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.दरवर्षी १ जानेवारीपासून नवीन रेडी रेकनरचे दर लागू होतात. मात्र यंदा हे दर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यानुसार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधीमंडळात रेडी रेकनरच्या नव्या दराची घोषणा केली