नवी मुंबईः स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जुनी शहरे म्हणजेच गावठाण क्षेत्र आणि मुख्य मार्केट्स या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका तर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीम अंतर्गत 31 मार्च रोजी बेलापूर प्रभाग क्रमांक-106 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता मोहिमेत बेलापूर गांव मधील मुख्य रस्ते, चौक आणि मच्छी मार्केट्स, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिम प्रसंगी नवी मुंबई महापालिका आरोग्य समिती सभापती तथा बेलापूर-शहाबाज मधील स्थानिक नगरसेविका सौ. पुनम मिथुन पाटील, महापालिका घनकचरा
व्यवस्थापन विभागाचे प्रशासकीय अधिकारी मनोहर गांगुर्डे, बेलापूर विभागाचे स्वच्छता अधिकारी सुनील सगणे, स्वच्छता निरीक्षक सुभाष म्हसे, पवन कोवे, कविता खरात, उपस्वच्छता निरीक्षक मिलिंद तांडेल, विजय चौधरी आदीसह 23 स्वच्छता कामगार आणि बेलापूर-शहाबाज ग्रामस्थ उपस्थित
होते.
स्वच्छतेबद्दल नागरिकांनी स्वत:पासून स्वच्छतेला सुरुवात करण्याची, स्वच्छता राखण्याबाबत परिसरात जनजागृती होण्यासाठी विभाग स्तरावर प्रयत्न होण्याची आणि स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे, असे मत यावेळी महापालिका आरोग्य समिती सभापती सौ. पुनम मिथुन पाटील यांनी व्यक्त केले.
नागरिकांनी सामाजिक आरोग्यासाठी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम नियमितपणे कर्तव्य भावनेने करावे, असे आवाहन यावेळी महापालिका अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी केले.