माजी खा. संजीव नाईकांंच्या हस्ते पायाभरणी
नवी मुंबई : कुकशेत गावातील मंदिरांचा पायाभरणी समारंभ माजी खासदार संजीव नाईकांच्या हस्ते शनिवारी सांयकाळी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सुजाता पाटील, नगरसेविका जयश्री ठाकुर, मैाजे कुकशेत गाव समितीचे अध्यक्ष माजी सरपंच बाळाराम पाटील, विरेंद्र लगाडे, दीपक म्हात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिमच्या महीला अध्यक्षा सुचीता पाटील, मनीषा लगाडे, वॉर्ड क्र. 94 च्या अध्यक्षा सौ.माधवी सावंत, कुकशेत गावचे वॉर्ड अध्यक्ष पांडुरंग कडु, महीला अध्यक्षा अलंका ठाकुर, कार्याध्यक्ष परशुराम पाटील, सेवादल अध्यक्ष सदाशिव पाटील, सारसोळे गावचे वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल, वॉर्ड क्र. 85 से.06 चे वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टावरे, वॉर्ड क्र. 86 चे वॉर्ड अध्यक्ष महादेव पवार, युवक अध्यक्ष पद्माकर मेहेर, मंदीर समितीचे उपाध्यक्ष ह. भ. प. रोहीदास पाटील, सचिव मनोहर मोरावकर, खजिनदार गणेश पाटील, अनंतबुवा पाटील, विश्वनाथ पाटील, बबन लक्ष्मन पाटील, युवक अध्यक्ष दीपक पाटील, कमलाबाई , वॉर्ड क्र. 85 से.06 चे वॉर्ड अध्यक्ष ठाकुर,तसेच बहुसंख्येने कुकशेत ग्रामस्थ व परिसरातील नागरिक ऊपस्थित होते.
हर्डेलिया कंपनीच्या रासायनिक त्रासामुळे 1995 साली कुकशेत गाव उच्च न्यायालयाच्या आदेशाने नवीन जागेत सारसोळे गावाशेजारी पुनर्वसीत झाले. पुनर्वसन होऊनही कित्येक वर्षापासुन कुकशेत ग्रामस्थ सुखसुविधांपासुन वंचित होते. सन 2010 रोजी सुरज पाटील नगरसेवक झाले आणि तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातुन 16 सामाजिक सुविधांचे भुखंड हस्तांतरीत करुन कुकशेत गावाच्या विकासाला दिशा दिली. गाव स्थलांतर झाले, पण मंदीर नाही, मंदीराकरिता भुखंड आरक्षित होते, पण हस्तांतरण नसल्यामुळे मंदीरांची उभारनी होतं नव्हती. सुरज पाटीलांच्या पुढाकाराने 2012 रोजी हा प्रश्न मार्गी लागला. 2012 रोजी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. 2012पासुन पुढे शासन दरबारी रितसर परवानगी प्राप्त करुन 2016 रोजी मंदीर उभारणीस प्रारंभ झाला.